• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान, माळेगाव. (Malegaon yatra)

श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे वसलेले प्रसिद्ध असे ठिकाण आहे. हे खंडोबाचे पुरातनकालीन मंदिर आहे.

सदर देवस्थान खंडोबा माळेगाव यात्रा म्हणून प्रसिद्धिस आहे. सदरचे देवस्थान हे हेमाडपंथी असून ते १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. तेथील लोकसंख्या २५०० आहे.सदर देवस्थानचा उत्सव मार्गशीर्ष अमावास्येच्या अगोदर २ दिवस व नंतर ३ दिवस असा ५ दिवस चालतो. त्यावेळेस देवस्थानचा छबिना निघतो. दक्षिण भारतातील सर्वात मोठी ग्रामीण यात्रा येथे भरते. ही यात्रा साधारणत: १५० वर्षापुर्वीपासून भारत आहे.

सदरील यात्रा जरी ५ दिवसांची भरत असली तरी जनावरांचा बाजार जवळपास एक माहिनाभर चालतो. यामध्ये घोडे, गाढव, उंट, देवणी, तसेच लालकंधारी वळू, गाई, तसेच कुत्रे, कोंबडे यांचाही यामध्ये समावेश आहे. जनावरांचा बाजार हा म्हणजे माळेगाव यात्रेच्या अर्थव्यवस्थेचा कणाच होय. माळेगाव यात्रेत पाच हजारांपासून बारा लाख रुपयांपर्यंत किमतीची अश्व् येत असतात.

या जत्रेत संसारोपयोगी वस्तू, मुलांसाठी खेळणी, खाऊ, मिठाई, शेतीची अवजारे, वेगवेगळ्या व्यवसायांसाठी लागणारी हत्यारे, कपडे, भांडी, जनावरांसाठी लागणाऱ्या साखळ्या, घुंगरू, झुल, खोगीर, पट्टे, कासरे, चाबूकगोंडे, महिलांना प्रसाधनासाठी लागणारे साहित्य, दागदागिने, सतरंज्या, लोकरीचे कपडे, स्वेटर, खोबरे, भंडारा, नारळ, बत्तासे, पेढे, मुरमुरे, रेवड्या इत्यादी सामुग्रीचे दुकाने थाटलेली आहेत. तुळजापूर, पंढरपूर, जेजुरीहून आणलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती, फोटो, कोसल्याचा पटका, शेला-पागोटे, चादर, कपडे याबरोबरच जुन्या कपड्यांची बाजारपेठ या ठिकाणी भरते.

मणी मल्ल ते दैत्य मर्दावयाला | तुझा भुतली साच अवतार झाला
उमा म्हालसा जाहली साह्य घ्याया | नमस्कार माझा तुला मालुराया.

जय देवा मार्तंडा | हाती घेउनिया खंडा
मारिले दुष्ट दैत्य | उडे त्रैलोकी झेंडा.

माळेगाव यात्रा

  • देवस्वारी व पालखीपुजा ईतिहास

    देवस्वारीचा मान नाकोजी नाईकांनंतर सातव्या पिढीकडे अव्याहतपाने चालू आहे. नाकोजी नाईक, नानासाहेब नाईक, बापूसाहेब नाईक, हैबतराव नाईक, मल्हारखान नाईक, व गणपतराव नाईक असा हा वारसा पुढील पिढीतील संजय नाईक चालवतील. निझामाच्या राजवटीत खंडोबाची देवस्वारी निघाली असताना निझामांत नागोजी नाईक यांची पालखी हेतूपरस्पर देवाच्या पालखीमागे ठेवली. काही अंतर पुढे जाताच पालखीच्या दांड्या मोडल्या. यावेळी पाठीमागच्या पालखीत बसलेल्या नागोजी नाईकांनी आपला फेटा काढून मोडलेल्या दांडयांना बांधला तेव्हा पालखी उचलली गेली. निझाम खजील झाला व तेव्हापासून नाईकांची पालखी देवस्वारीत देवाच्या पुढे असते. रीस्नगावाहून निघून नैक्ची देवस्वारी पूजेच्या आदल्या देवशी माळेगावात पोहोचते. देवस्वारीने सुरु झालेली यात्रा जातपंचायतीने संपते.

  • जनावरांचा बाजार

    माळेगाव यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे जनावरांचा बाजार. यामध्ये घोडे, गाढव, उंट, देवणी, तसेच लालकंधारी वळू, गाई, तसेच कुत्रे, कोंबडे यांचाही यामध्ये समावेश आहे. जनावरांचा बाजार हा म्हणजे माळेगाव यात्रेच्या अर्थव्यवस्थेचा कणाच होय. माळेगाव यात्रेत पाच हजारांपासून बारा लाख रुपयांपर्यंत किमतीची अश्वे येत असतात.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys