(जि :- उस्मानाबाद महाराष्ट्र)
नळदुर्ग-अणदूरजवळ मैलारपूर क्षेत्र तेथील खंडोबास मल्हार-म्हाळसाकांत अशा नावाने ओळखतात. देवस्थान फार जुने असून ते हेमाडापंथी आहे. देवास अभिषेक झाल्यानंतर मूर्तीस चंदनाचा लेप दिला जातो. त्यावर डोळे, कान, नाक बसवितात व नंतर देवास पोशाख केला जातो.
ठिकाणी देवाचे वास्तव्य हे १० महिने व ऊर्वरित २ महिने हे कर्नाटकातील खानापूर येथे असते. पौराणिक माहितीनुसार बाणाईचे लग्न खंडोबाशी झाले त्या वेळेपासून खंडोबा मल्लया या नावाने प्रसिद्ध झाला. मल्हारी मार्तंड हे बाणाईस घेऊन जेजुरी या ठिकाणी आले. तेथे कडेपठाराजवळ म्हाळसाकांत(पहिली पत्नी) हिच्याशी बाणाईचे भांडण झाले. यावर मल्हारी मार्तंड यांनी बाणाईस जेजुरीच्या पायथ्याशी तिला राहण्यास सांगितले. प्रत्येक रविवारी मल्हारी मार्तंड हे बाणाईच्या भेटीत येत असत.