• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

माता रत्नेश्वरी देवी

माता रत्नेश्वरी देवी हे वडेपुरी येथील नांदेड जिल्ह्यातील महत्वाचे असे आराध्य दैवत आहे. जवळ जवळ सातशे वर्षांपासून माता रत्नेश्वरीचे येथे वास्तव्य आहे. लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असल्याने येथे शेकडो भाविक येत असतात. "नवरात्र" देवीच्या दर्शनाशिवाय पुर्ण होत नाही. "पायी दिंडी" हे नवरात्र महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. अनेक भावीक देवीच्या दर्शनासाठी नांदेडहून तसेच आजुबाजूच्या गावांतून पदयात्रा घेऊन येतात.

त्रिशुळ कुंड, महादेव मंदिर आणि अमृत सरोवर यासाठीही हे मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिरा समोरील कुंडात माता रत्नेश्वरीने त्रिषुळ मारून पाणी काढले म्हणून यांस त्रिशुळ कुंड किंवा रत्नेश्वरी कुंड असे म्हणतात. या कुंडातील पाण्याचा रंग हिरवा असा आहे तसेच कुंडातील पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेचे अनेक रोग नष्ट झाल्याचे भावीक सांगतात. महादेव मंदिर हे देवीने रत्ना या मुलीच्या रुपात वसवले आहे असे मानले जाते तसेच मंदिराच्या बाजुला असलेल्या सरोवरात दर बारा वर्षाला काशीचे पाणी येते हे लोकांनी अनुभवले आहे.