• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

लोककला महोत्सव

सुमारे १६-१७ वर्षांपासून माळेगाव यात्रेत लोककला महोत्सवाचे आयोजन केले जाते. पूर्वी तमाशाचे फड व संगीत बारयातून नाचगाणे चालायचे. धनिकांना या कलेचा आस्वाद घेता येत असे. परंतु गोरगरीबांना मात्र यातून वंचीत राहावे लागे. याकरिता माळेगाव यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या लोककलाकारांना सार्वजनिक व्यासपीठ मिळावे व सर्वसामान्य जनतेला कलेचा आस्वाद घेता यावा, म्हणून लोककला महोत्सव आयोजन केले जाते.

या व्यासपीठावर अनेक कलाकारांना आपली कला सामान्य रसिंकजनांसमोर सादर करण्याची संधी मिळाली. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनाही या लोककला महोत्सवात प्रथम क्रमांकाची नृत्यांगना म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. १६-१७ वर्षांपासून सुरु झालेला हा महोत्सव अखंडपणे चालू असून, त्याला लोकाश्रय मिळाला आहे.

“डॉ. म. वा. धोंडे यांनी लावणीची एक सर्वसमावेषक व्याख्या बनविली आहे. सर्वसामान्यांच्या मनोरंजनाकरिता त्यांना रुचतील अशा लौकिक, पौराणिक किंवा अध्यात्मिक विषयांवर रचलेली कडे किंवा ढोलकी यांच्या विशिष्ठ ढंगावर म्हटली जाणारी ठसकेबाज व सफाईदार पद्ण्यावार्तानी भ्रंगावर्तनी जातीरचना म्हणजे लावणी”.