हे तीर्थक्षेत्र औरंगाबादपासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. देऊळ हेमाडपंथी व १ हजार वर्षापूर्वीचे आहे. मार्गशीर्ष शु. १ ते चंपाषष्ठी या काळात उत्सव असून त्यावेळेस देवळातून पालखी निघून ती तेथील जहागीरदार यांच्या वाड्यात येऊन तेथे सकाळी १० ते १२ या वेळेत पूजा व लघुरुद्र होऊन पालखी रात्री ८ वाजेपर्यंत देवळात परत येते. सदरच्या उत्सवात खर्च रु. ३० ते ४० हजार येतो.