श्री क्षेत्र मैलार – मल्हारी -म्हाळसाकांत – सदर ठिकाणी दोन मंदिरे असून (१) खंडोबा म्हाळसाकांत (२) गंगी माळम्मा म्हाळसादेवी .
देऊळ जुने असून सिमारे एक हजार वर्षापूर्वीचे आहे. ते हेमाडपंथी बांधणीचे आहे. मुख्य उत्सव चंपाषष्टी. चंपाषष्ठीचे दिवशी एकवीस किलो हळद अधिक लिंबू पाणी यांचे मिश्रण करून देवास लेप देतात. त्या आधी देवास तेलाचा अभिषेक केला जातो. येथील मूळ मूर्ती शंकराची असून ती वारुळाच्या मातीपासून झालेली आहे. सदरची मूर्ती स्वयंभू आहे व ती ५’ उंच असून मूर्तीस ४ हात आहेत प्रत्येक हातात त्रिशूळ, भंडारा, डमरू व खड्गत आहे.
मुख्य देवालयाचे बाजूस २ द्वारपाल आहेत. मूर्तीचे मांडीखाली २ राक्षस असून पैकी १ मल्लासुर व दुसरा मणिकासुर. आश्विन शु. १ ते दसरा घटस्थापना व नंतर पालखी निघते. ती गावातून निघून शेजारील म्हाळसादेवी मंदिरात जाते. येथे ती दुसरे दिवशी सकाळी ७ पर्यंत असते. नंतर पंचपक्वान्नाचे जेवण होते. देवस्थानाचे २ पुजारी असून ते ६-६ महिन्यांनी बदलतात. देवस्थानाचा खर्च प्रतिवर्षी अंदाजे रु. ५ लक्ष हा भक्तांचा देणगीतून करतात. देवास नवस बोलल्यास तो पूर्ण होतो.