• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

श्री. रविंद्रकुमार सिंघल

माळेगाव यात्रा श्री. खंडेरायाची येळकोट येळकोट जय मल्हाराची. खंडोबा हे महाराष्ट्रातील व कर्नाटकातील बऱ्याच जणांचे कुलदैवत आहे. अत्यंत लोकप्रिय अशा या देवाला मल्हारी, मल्हारी मार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी अनेक नावे आहेत. साधारनपणे गणपती, मारुती, महादेव, देवी याप्रमाणे प्रत्येक गावात खंडोबाचे मंदिर असते.

या यात्रेत खंडोबाचे जागरण, भक्त येतात, ज्वारीचे पाच भांडे, त्यावर पांढराशुभ्र कपडा, त्याला पापडांची माळ घातलेली, आतमध्ये कलश ठेवला असतो, अशी अनेक ठिकाणी गादी भरलेली दिसते. लोक देवाला भजत असतात. रात्रभर देवाच्या नावाने जागरण केले जाते. डफ वाजत असतो.एखादी पौराणिक कथा लावली जाते. ही कथा एकण्यात लोक रंगून जातात.

माळेगाव यात्रेतून मला बरच काही शिकता आलं. वेगवेगळ्या जाती-जमातीची माणंस भेटली. त्यांचा स्वभाव, त्यांचा राहणीमान, जगण्यासाठीची भटकंती मी अनुभवली आहे. माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्षन मला अधिक भावलं. आपापल्या समाज व्यवस्तेत पशू, पक्षी, प्राणीमात्रावर दया आणि माया लावणारी माणसं या जत्रेत भेटली. खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी होते.

अनेक पिढ्यांपासून खंडोबाच्या नावाचा गजर करणारी, भंडारा उधळणारी माणसं या यात्रेत दरवर्षी न चुकता येत असतात, यापुढेही येत राहतील.